मंचावर उपस्थित सन्माननीय अतिथीगण , आदरणीय शिक्षक वर्ग , जागरूक पालक वर्ग आणि माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
७५ वर्षांचा काळ कितीही गौरवशाली असला, संकट-आव्हानं असली, तरी आज आपण अमरत्वाच्या काळात प्रवेश करत आहोत. पुढील २५ वर्ष आपल्या देशासाठी खूप महत्त्वाची आहेत. येत्या २५ वर्षात आपण आपले संकल्प आणि शक्ती पंचप्राणावर केंद्रित केली पाहिजे.असे माननीय प्रधानमंत्री यांनी लाल।किल्ल्यावरून सांगितले आहे. त्या पंच प्रण म्हणजे प्रतिज्ञांची आठवण करून देण्यासाठी आज मी आपणासमोर उभा आहे.
पहिला प्रण - आता देश मोठे संकल्प घेऊन पुढे जाईल. हा विकसित भारताचा संकल्प आहे. मित्रांनो माझे आजोबा माझे बाबा आणि मी गेली 75 वर्ष हेच ऐकत आलोय की, आपला भारत देश एक विकसनशील देश आणि येत्या काही वर्षात तो विकसित होणार आहे. मित्रांनो किमान आपल्या पुढील पिढीला तरी गौरवाने म्हणावे वाटेल असा आपला भारत देश आपण 2047 पर्यंत विकसित करण्याचा प्रण करूया.
दुसरा प्रण - कोणत्याही कोपऱ्यात गुलामगिरीची खूण असेल, तर ती राहू द्यायची नाही. गुलामगिरीतून मुक्त व्हायचं आहे.
तिसरा प्रण - आपल्या वारशाचा आपल्याला अभिमान असायला हवा. याच वारशाने भारताला एकेकाळी सुवर्णकाळ दिला होता. या वारशाचा आपल्याला अभिमान असायला हवा.आपली भाषा ,आपली संस्कृती -जीवनपद्धती आपण पुन्हा स्वीकारली पाहिजे.
चौथा प्रण - १३० कोटी देशवासीयांमध्ये एकता असणं महत्त्वाचं आहे. जात , पात धर्म या पलीकडे भारतीय होऊन देशात विकसित केले पाहिजे.
पाचवा प्रण - नागरिकांचं कर्तव्य महत्त्वाचं आहे. त्याकाळी देश बलिदान मागत होता पण आज बलिदानाची गरज नसून प्रत्येकाने प्रामाणिकपणाने काम करण्याची , आपापली जबाबदारी पार पाडण्याची आस आज देशाला आहे.
म्हणून ह्या प्रतिज्ञानी आपल्याला पुढील 25 वर्ष वाटचाल करीत आपल्या देशाचा सुवर्णकाळ परत आणायचा आहे.
जय हिंद.
0 Comments